राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना परीक्षा (NMMS)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत वर्ग 8 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा घेतली जाते . या परीक्षेला 3 लक्ष 50 हजार पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांचे शासकीय अथवा अनुदानित शाळेत शिकत असणारे पाल्य प्रविष्ट होवू शकतात. यामध्ये उत्तम गुण मिळवून गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत दरमहा १००० रुपये अशी एकूण 48000 रुपये शिष्यवृत्ती मिळते .खाली परीक्षेचा अभ्यासक्रम व सरावासाठी चाचण्या देण्यात आल्या आहेत . पालकांनी आपल्या मोबाईल च्या सहाय्याने तसेच शाळांनी आपल्या डिजिटल रूम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव घेतल्यास निश्चितच विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळवता येईल.
बुद्धिमत्ता विषयाच्या परीक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व घटकांवर आधारित चाचण्या
विज्ञान विषयाच्या परीक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व घटकांवर आधारित मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या चाचण्या
गणित विषयाच्या परीक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व घटकांवर आधारित मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या चाचण्या
इतिहास व नागरिकशास्त्र विषयाच्या परीक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व घटकांवर आधारित मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या चाचण्या
भूगोल विषयाच्या परीक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व घटकांवर आधारित मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या चाचण्या
स्पर्धात्मक दृष्टीकोण वृदींगत होण्यासाठी आठवडी चाचण्या व प्रमाणपत्र