6.3 नफा, तोटा


1. एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या दीडपट आहे. तर नफा अथवा तोटा पुढीलपैकी कोणत्या प्रकारे दाखवालं ?




2. पतंगरावाने एक वस्तू 50 रुपयास घेऊन ती 55 रुपयांस विकली, तर त्याला शेकडा नफा किती झाला ?




3. विक्रीची किंमत नफ्याच्या 21 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती ?




4. एक रेडीओ 1650 रुपयांस विकल्याने शे. 10 नफा होतो. तर रेडीओची खरेदी किंमत किती ?




5. एक वस्तू 960 रुपयांना विकल्याने विक्रीच्या 1/12 तोटा झाला, तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला ?




6. एक पुस्तक 12 रुपयांस विकल्यामुळे 2 रु. नफा होतो. तेच पुस्तक 8 रुपयांस विकले तर, शेकडा नफा अगर तोटा किती येईल ?




7. खरेदी किंमत 430 रु., शेकडा नफा 15, तर विक्री किंमत किती ?




8. एक वस्तू 65 रुपयांस विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा होण्यासाठी ती वस्तू 105 रुपयांस विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?




9. 20% नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांस विकली जाते, जर ती वस्तू 70 रुपयांस विकली तर शेकडा नफा किती ?




10. 30% नफा घेऊन काही पुस्तके विकल्यास 30 रु. नफा होतो, तर पुस्तकांची खरेदी किंमत किती ?




11. एका दुकानदाराने 60 वस्तू खरेदी केल्या. त्यातील 10 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या तरीही 15 वस्तूच्या खरेदीइतका नफा झाला, तर शेकडा नफा किती ?




12. एक वस्तु 256 रुपयांस विकल्यामुळे विक्रेत्याला शेकडा 20 तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?




13. 1 कि.ग्रा. ज्वारी 5 रुपयांस विकल्यामुळे 20% नफा होतो, तर 1 कि.ग्रा. ज्वारीची खरेदी किंमत किती ?




14. एक वस्तू 600 रुपयांस विकल्याने खरेदीच्या 1/11 नफा होतो तर खरेदी किंमत किती ?




15. एक वस्तू 1260 रुपयांस विकल्याने शेकडा 5 नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?




16. 15 रु. प्रतिकिलो दराने 1 क्विंटल साखर खरेदी केली व ती 16.35 रुपये दराने विकली, तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ?




17. 16 पुस्तकांची विक्रीची किंमत 20 पुस्तकांच्या खरेदीच्या किमतीएवढी आहे, तर शेकडा नफा अगर तोटा किती ?




18. एक वस्तू 75 रुपयांस विकल्याने काही तोटा होतो ती वस्तू 90 रुपयांस विकली तर त्या तोट्याच्या दुप्पट नफा होतो, तर खरेदी किंमत किती ?




19. सलीमने 80 कोंबड्या 3200 रुपयांस विकत घेऊन त्यापैकी 16 कोंबड्या 10% नफ्याने व उरलेल्या 20% नफ्याने विकल्या, तर एकंदरीत त्याला शेकडा नफा किती झाला ?




20. छापील किमतीवर 20% सुट देऊनही 25% नफा होत असल्यास 500 रु. छापील किंमत असलेल्या वस्तूची खरेदीची किंमत किती ?




21. एक रेडीओ 1200 रुपयात विकले तेव्हा त्याला 25% नफा झाला तर त्या रेडीओची खरेदीची किंमत किती ?




22. एक घड्याळ 600 रु. विकल्याने खरेदीच्या 20% तोटा झाला, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती ?




23. एक टेबल 430 रु. खरेदी करून शे. 15 नफ्याने विकला तर टेबलाची विक्री किंमत किती ?




24. खरेदी किंमत = 40 रु. विक्री किंमत = 48 तर शे. नफा किती ?




25. एक वस्तू 85.25 रुपयास विकल्याने तिच्या खरेदीइतका शे. नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top