This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
10. पेशी व पेशीअंगके
1.
खालीलपैकी कोणामध्ये पेशीभित्तिका नसते.
1) कवक
2) प्राणीपेशी
3) वनस्पती
4) शैवाल
2.
पेशीतील पेशीद्रव्य कोठे आढळते?
1) रिक्तीकेत
2) पेशिभित्तीकेत
3) केंद्रक व हरितलवक मध्ये
4) प्रद्रव्यपटल व केंद्रक मध्ये
3.
पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशीविभाजन यांवर नियंत्रण कोण ठेवते?
1) पेशिभित्तिका
2) पेशिद्रव्य
3) केंद्रक
4) रिक्तिका
4.
खालीलपैकी कोणते कार्य आंतर्द्रव्यजालिकेचे नाही?
1) पेशीला आधार देणारी चौकट.
2) जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे
3) अन्न, हवा, पाणी यांमार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे.
4) प्रथिनांचे वहन करणे.
5.
गॉल्गीकाय (गॉल्गी संकुल) बाबत सत्य विधान ओळखा
1) पेशीभित्तिका, प्रद्रव्यपटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे.
2) रिक्तिका व स्त्रावी पीटिका यांची निर्मिती करणे.
3) गॉल्गी संकुल हे पेशीतील ‘स्त्रावी अंगक’ आहे.
4) वरीलपैकी सर्व
6.
मी कोण ते ओळखा
माझा ठराविक आकार नसतो. पेशीच्या गरजेनुसार माझी रचना बदलत असते. माझे पटल एकपदरी असते.
1) लयकारिका
2) पेशीद्रव्य
3) रिक्तिका
4) हरितलवक
7.
वनस्पतींच्या पानांत चालणाऱ्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी --------- फार महत्त्वाची आहेत.
1) हरितलवके
2) गॉल्गी काय
3) तंतुकणिका
4) रिक्तिका
8.
तंतुकणिकेबाबत सत्य विधान ओळखा
1) प्राणीपेशी व वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिका नसतात
2) प्राणीपेशीपेक्षा वनस्पतीपेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते
3) प्राणीपेशीपेक्षा वनस्पतीपेशीत तंतुकणिकांची संख्या जास्त असते
4) प्राणीपेशी व वनस्पती पेशी मधील तंतुकणिकांची संख्या सारखीच असते
9.
वनस्पतींच्या भागांना पिवळा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो?
1) ॲन्थोसायनिन
2) बिटालीन्स
3) कॅरोटीन
4) झॅन्थोफिल
10.
चुकीची जोडी ओळखा
1) प्रदव्यपटल-प्रथिनांचे रेणू
2) आदिकेंद्रकी पेशी- 1-10 मायक्रोमीटर
3) तंतुकणिका-ATP हे ऊर्जा समृद्ध संयुग
4) पेशीय भक्षण-टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकणे.
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top