This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
उतारा
1.
खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.
एका छोट्या गावात राम नावाचा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. त्याचे कुटुंब गरीब होते, पण ते नेहमी आनंदी राहत. एके दिवशी रामचे एक श्रीमंत मित्राचे शहरातून गावात आगमन झाले. तो महागड्या कपड्यांमध्ये, मोठ्या गाडीने आला. त्याने रामच्या घरी येऊन त्याच्या साधेपणाची थट्टा केली.
रामला वाईट वाटले, पण त्याने विचार केला – “मी गरीब आहे का? माझ्याकडे प्रेमळ आई-वडील आहेत, दिवसातून दोन वेळचं जेवण आहे, आणि मी आनंदी आहे.”
तो मित्र परत गेला, पण रामच्या मनात श्रीमंतीची खरी व्याख्या उमटली – "खरी श्रीमंती पैशात नसते, तर समाधान, प्रेम आणि आनंद यात असते."
रामचे कुटुंब गरीब असूनही का आनंदी होते?
1) कारण ते श्रीमंत बनण्याचे स्वप्न बघत होते
2) कारण त्यांच्याकडे मोठं घर होतं
3) कारण त्यांच्याकडे समाधान आणि प्रेम होतं
4) कारण त्यांनी खूप पैसा कमावला होता
2.
शहरातून आलेल्या मित्राने काय केले?
1) रामचे स्वागत केले
2) रामची मदत केली
3) रामच्या साधेपणाची थट्टा केली
4) रामला भेटायला नकार दिला
3.
रामने श्रीमंतीची कोणती व्याख्या स्वीकारली?
1) ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत
2) ज्याच्याकडे मोठं घर आहे तो श्रीमंत
3) ज्याच्या कपड्यांवर ब्रँड आहे तो श्रीमंत
4) ज्याच्याकडे समाधान, प्रेम व आनंद आहे तो खरा श्रीमंत
4.
या उतार्यातून आपल्याला काय शिकायला मिळते?
1) मित्रांपासून दूर राहावे
2) केवळ पैसा महत्वाचा
3) आपल्याकडे जे आहे त्यात आनंद मानावा
4) फक्त श्रीमंत लोकच यशस्वी होतात
5.
खालीलपैकी कोणता संदेश या उताऱ्यातून मिळतो?
1) गरिबी वाईट गोष्ट आहे
2) दिखावा महत्वाचा आहे
3) समाधान आणि प्रेम हेच खरी श्रीमंती आहे
4) श्रीमंत लोकच चांगले असतात
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top