This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
2.7 सरासरी
1.
12 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्यांची सरासरी किती ?
1) 255
2) 552
3) 548
4) 452
2.
तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्याची सरासरी किती ?
1) 15000
2) 10000
3) 36999
4) 36909
3.
वर्गशिक्षकाने वर्गातील मुलांची रोजची उपस्थिती संख्या एका कागदावर लिहून त्यांची बेरीज केली परंतु तो कागद पावसात भिजल्याने त्यावरील आकडे पुसले गेले. शाळा त्या महिन्यात 25 दिवस होती व एकूण 25 दिवसाच्या उपस्थित संख्यांची बेरीज 1125 होती तर त्या महिन्याची सरासरी उपस्थिती किती ?
1) 45
2) अपुरी माहिती
3) 37.5
4) 38
4.
एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 वर्षे आहे. त्यापैकी 10 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्षे आहे व राहिलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती ?
1) 45
2) 30
3) 35
4) 40
5.
गव्हाच्या 5 पोत्यांचे सरासरी वजन 98.5 कि.ग्रा. आहे. सहाव्या पोत्याचे वजन मिळवून सहा पोत्यांचे सरासरी वजन 99.4 कि.ग्रा. आहे तर सहाव्या पोत्याचे वजन किती ?
1) 101.9
2) 100.9
3) 102.9
4) 103.9
6.
सचिनच्या तीन डावातील सरासरी धावसंख्या 71 आहे. चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या धावांची सरासरी 1 ने कमी होते तर त्याच्या चौथ्या डावातील धावांची संख्या किती ?
1) 67
2) 66
3) 68
4) 69
7.
आकाशला तीन धान्याचे उत्पन्न 9560 रु., 7497 रु, आणि 9322 रु, झाले. तर त्याचे प्रत्येक धान्याचे सरासरी उत्पन्न किती ?
1) 9783
2) 7893
3) 8793
4) 8795
8.
x संख्यांची सरासरी 15 आहे. त्यापैकी एक संख्या 15 आहे हि संख्या सोडून उरलेल्या संख्यांची सरासरी किती ?
1) x -15/15
2) 15x-15/x
3) 15x-15/14
4) 15x-15/x-1
9.
73,77,79,76,74, आणि 7* या दोन अंकी संख्यांची सरासरी 76 आहे तर * च्या जागी कोणता अंक येईल ?
1) 7
2) 8
3) 6
4) 5
10.
ताशी सरासरी 40 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारीत वेळेत पोहोचते. जर ताशी सरासरी 35 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा 15 मी. उशिरा पोहोचते तर तिने कापावयाचे अंतर किती ?
1) 60 कि.मी.
2) 80 कि.मी.
3) 70 कि.मी.
4) 40 कि.मी.
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top