This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
6 नोकरशाही
1.
शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे काय ?
1) लोकशाही
2) नोकरशाही
3) यापैकी नाही
4) हुकुमशाही
2.
खालीलपैकी कोणते मुलभूत कार्य शासनसंस्था पार पाडते ?
1) नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत करण्यासाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवणे.
2) वरील सर्व
3) अंतर्गत सुरक्षाविषयक धोक्यांपासून नागरिकांचे संरक्षण करणे.
4) देशाचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणे.
3.
अंतर्गत सुरक्षिततेसाठी नागरी सेवेला मदत करणाऱ्या सेवेला काय म्हणतात ?
1) प्रशासकीय सेवा
2) लोकसेवा
3) शासकीय सेवा
4) लष्करी सेवा
4.
समाजाचा विकास साध्य करण्यासाठी नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत करणाऱ्या सेवेला ________ म्हणतात.
1) जनसेवा
2) सनदी सेवा
3) लष्करी सेवा
4) यापैकी नाही
5.
विविध खात्यांच्या मंत्र्याच्या सचिवाची नेमणूक ______ सेवेतून केली जाते.
1) शासकीय
2) लष्करी
3) खासगी
4) सनदी
6.
खालीलपैकी नोकरशाही यंत्रणेचे कार्य कोणते ?
1) कर गोळा करणे.
2) वरील सर्व
3) कायदा व सुव्यवस्था राखणे.
4) नागरिकांना सामाजिक सुरक्षा देणे.
7.
कोणत्याही पक्षाचे शासन सत्तेवर येवो, त्या शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे याचाच अर्थ नोकरशाही यंत्रणा राजकीयदृष्ट्या ___________.
1) तटस्थ नसते
2) यापैकी नाही
3) तटस्थ असते
4) सक्रीय असते
8.
एखाद्या खात्याच्या गैरव्यवहारांसाठी संसद कोणाला जबाबदार धरते ?
1) संबंधित खात्याच्या सचिवास
2) दोन्हीही नाही
3) वरीलपैकी दोन्ही
4) संबंधित खात्याच्या मंत्र्यास
9.
भारतात सनदी सेवांचे प्रमुख किती प्रकार आहेत ?
1) तीन
2) एक
3) चार
4) दोन
10.
खालीलपैकी कोणती सनदी सेवा हि अखिल भारतीय सेवा आहे ?
1) भारतीय महसूल सेवा
2) उपजिल्हाधिकारी
3) भारतीय पोलीस सेवा
4) भारतीय विदेश सेवा
11.
खालीलपैकी राज्यसेवा कोणत्या आहेत ?
1) गटविकास अधिकारी
2) उपजिल्हाधिकारी
3) वरील सर्व
4) तहसीलदार
12.
अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार कोण निवडते ?
1) केंद्रीय राज्यसेवा आयोग
2) राज्य लोकसेवा आयोग
3) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)
4) महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top