This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
7. असहकार चळवळ
1.
खालीलपैकी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कोणता कालखंड 'गांधीयुग' या नावाने ओळखला जातो ?
1) इ.स.1920 ते 1940
2) इ.स.1920 ते 1945
3) इ.स.1915 ते 1947
4) इ.स.1920 ते 1947
2.
1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाकडे आली ?
1) सुभाषचंद्र बोस
2) पंडित जवाहरलाल नेहरू
3) महात्मा गांधी
4) सरदार वल्लभभाई पटेल
3.
गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा परतले ?
1) 1914
2) 1915
3) 1916
4) 1917
4.
गांधीजींनी त्यांचा भारतातील पहिला सत्याग्रह म्हणजेच चंपारण्य सत्याग्रह कोणत्या साली केला ?
1) 1916
2) 1917
3) 1915
4) 1918
5.
1918 मध्ये गुजरातमधील __________ जिल्ह्यात गांधीजींनी साराबंदी चळवळ सुरु केली.
1) राजकोट
2) साबरमती
3) अहमदाबाद
4) खेडा
6.
खालीलपैकी कोण अहमदाबादच्या गिरणी कामगार लढ्यात कामगारांसोबत उपोषणास बसले होते ?
1) रवींद्रनाथ टागोर
2) सरदार वल्लभभाई पटेल
3) महात्मा गांधी
4) अली बंधू
7.
17 मार्च 1919 रोजी केलेल्या रौलट कायद्यात कोणत्या तरतुदी होत्या ?
1) दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई.
2) कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करणे.
3) न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबणे.
4) वरील सर्व.
8.
कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले गेले ?
1) रौलट कायदा
2) 1935 चा कायदा
3) मोर्ले-मिंटो कायदा
4) रेग्युलेटिग अॅक्ट
9.
कोणत्या कायद्याच्या विरोधात 6 एप्रिल 1919 ला देशात सर्वत्र हरताळ पाळण्याचे आवाहन करण्यात आले ?
1) मोर्ले
मोर्ले-मिंटो कायदा
2) मॉंटेग्यू-चेम्सफोर्ड कायदा
3) रौलट कायदा
4) इंडियन काउन्सील कायदा
10.
जालियानवाला बाग हत्याकांड केव्हा घडले ?
1) 19 एप्रिल 1919
2) 13 एप्रिल 1919
3) 6 एप्रिल 1919
4) 21 एप्रिल 1919
11.
रौलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्यात डॉ.सत्यापाल व सैफुद्दीन किचलु यांना अटक झाली, या घटनेच्या निषेधार्थ कोणत्या सणाच्या निमित्ताने जालियानवाला बागेत सभा आयोजित करण्यात आली होती ?
1) बैसाखी
2) होळी
3) गुढीपाडवा
4) तिज
12.
जालियानवाला बागेत भरलेल्या सभेत बंदुकीत शेवटची गोळी असेपर्यंत गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला ?
1) मायकल ओडवायर
2) जनरल डफरीन
3) जनरल डायर
4) लॉर्ड कर्झन
13.
जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून __________ यांनी ब्रिटीश सरकारने दिलेल्या 'सर' या पदवीचा त्याग केला.
1) महात्मा गांधी
2) लाला लजपतराय
3) पंडित जवाहरलाल नेहरू
4) रवींद्रनाथ टागोर
14.
जालियानवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी ब्रिटीश सरकारने कोणत्या कमिशनची नियुक्ती केली ?
1) मुडीमन कमिशन
2) सायमन कमिशन
3) हंटर कमिशन
4) रॉयल कमिशन
15.
तुर्कस्तानच्या सुलतानावर म्हणजेच जगभरातील मुस्लिमांच्या खलिफावर पहिले महायुध्द संपल्यावर इंग्रजांनी निर्बंध लावले. या विरुध्द खलिफाला पाठींबा म्हणून भारतीय मुस्लिमांनी कोणती चळवळ सुरु केली ?
1) खिलाफत चळवळ
2) असहकार चळवळ
3) सविनय कायदेभंग चळवळ
4) चलेजाव चळवळ
16.
अली बंधुनी भारतात सुरु केलेल्या खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते ?
1) नवाब सलीम उल्लाह
2) महात्मा गांधी
3) मोहम्मद अली जिन्हा
4) सर सय्यद अहमद खान
17.
असहकार चळवळ कोणत्या उद्देशाने सुरु करण्यात आली ?
1) जर भारतीयांनी ब्रिटीशांशी संपूर्ण असहकार पुकारला तर ब्रिटीश शासन कोसळून पडेल.
2) खिलाफत चळवळ चालू ठेवण्यासाठी.
3) जालियानवाला बाग हत्याकांडातील पीडितांना आर्थिक मदत मिळावी.
4) दलितांना त्यांचे हक्क मिळावे.
18.
1920 मध्ये राष्ट्रीय सभेच्या नागपूर अधिवेशनात झालेल्या असहकार ठरावानुसार कशावर बहिष्कार घालायचे निश्चित करण्यात आले ?
1) कार्यालये व न्यायालये
2) वरील सर्व
3) परदेशी वस्तू
4) सरकारी शाळा व महाविद्यालये
19.
असहकार चळवळीबाबत चुकीचे विधान ओळखा.
1) असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटीश सरकारने दडपशाहीची भूमिका अवलंबली.
2) असहकार चळवळीचा ठराव 1920 मध्ये राष्ट्रीय सभेच्या मुंबई येथे भरलेल्या अधिवेशनात मंजूर झाला.
3) असहकार चळवळीमुळे शाळा-महाविद्यालयांवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली.
4) 1922 मध्ये गांधीजीनी असहकार चळवळ स्थगित केली.
20.
चौरीचौरा प्रकरण उत्तर प्रदेश मधील कोणत्या जिल्ह्यात घडले ?
1) अलाहाबाद
2) लखनौ
3) गोरखपूर
4) कानपूर
21.
पुणे जिल्ह्यात ब्रिटीश शासनाविरुद्ध मुळशी सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला ?
1) पांडुरंग महादेव बापट
2) गोपाळ गणेश आगरकर
3) श्रीपाद अमृत डांगे
4) आचार्य विनोबा भावे
22.
गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम सुरु केला. यात कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होता ?
1) अस्पृश्यता निवारण
2) मद्यपान बंदी
3) वरील सर्व
4) हिंदू-मुस्लीम ऐक्य
23.
खालीलपैकी कोणी स्वराज्य पक्षाची स्थापना केली ?
1) सर्व पर्याय बरोबर
2) मोतीलाल नेहरू
3) चित्तरंजन दास
4) न. ची. केळकर
24.
1927 मध्ये नेमलेल्या सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार का टाकला ?
1) सायमन कमिशनने संपूर्ण स्वराज्याची मागणी फेटाळून लावली.
2) यापैकी नाही
3) सायमन कमिशनने मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात यावे अशी शिफारस केली.
4) सातपैकी एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून.
25.
सायमन कमिशनविरुद्ध निदर्शने करीत असताना कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला केला ?
1) जनरल डायर
2) सँडर्स
3) विस्टन चर्चिल
4) कर्झन
26.
भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणत्या भारतमंत्र्याने केली ?
1) स्टॅनले
2) मोर्ले
3) वेव्हेल
4) बर्कनहेड
27.
नेहरू अहवालामध्ये कोणकोणते प्रस्ताव अंतर्भूत होते ?
1) प्रौढ मतदार पद्धती लागू करावी.
2) भारतीयांना मुलभूत नागरी हक्क द्यावेत.
3) भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे.
4) वरील सर्व.
28.
डिसेंबर 1929 मध्ये भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
1) जे. बी. कृपलानी
2) लाला लजपतराय
3) प. जवाहरलाल नेहरू
4) मौलाना आझाद
29.
26 जानेवारी 1930 ला तिरंगा फडकवून हा दिवस __________ म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले.
1) प्रजासत्ताक दिन
2) हुतात्मा दिन
3) ध्वजदिन
4) स्वातंत्र्यदिन
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top