This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ
1.
ब्रिटीश राजवटीच्या काळात कोणत्या कारणामुळे भारतीय शेतीचा कणा मोडला ?
1) सततचे दुष्काळ
2) शेतसाऱ्याचे ओझे
3) शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घ्यावयास लावणे
4) वरील सर्व
2.
भारतीयांना न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची ओळख कशामुळे झाली ?
1) पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार
2) संगणकीय शिक्षण
3) धार्मिक शिक्षणाचा प्रसार
4) नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रसार
3.
ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना कोठे केली ?
1) मद्रास
2) कोलकाता
3) मुंबई
4) दिल्ली
4.
खालीलपैकी कोणत्या भारतीय विद्वानाने प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला ?
1) दादाभाई नौरोजी
2) महर्षी कर्वे
3) रा. गो. भांडारकर
4) विठ्ठल रामजी शिंदे
5.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हि संस्था गेल्या शंभर वर्षांपासून कोठे कार्यरत आहे ?
1) पुणे
2) सातारा
3) कोल्हापूर
4) ठाणे
6.
राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली ?
1) 28 डिसेंबर 1885
2) 28 डिसेंबर 1880
3) 25 डिसेंबर 1885
4) 28 डिसेंबर 1985
7.
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी उपस्थित होते. हे अधिवेशन कोठे भरले होते ?
1) पुणे
2) अलाहाबाद
3) मुंबई
4) दिल्ली
8.
राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन ऩॅशनल कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
1) व्योमेशचंद्र बॅनर्जी
2) सचिदानंद सिन्हा
3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
4) सर अॅलन ह्यूम
9.
खालीलपैकी राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे कोणती होती ?
अ] भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे.
ब] परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे.
क] भारतात धार्मिक सुधारणा चळवळ उभी करणे.
ड] लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करून राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे.
1) सर्व पर्याय बरोबर
2) अ, क व ड बरोबर
3) अ, ब व क बरोबर
4) अ, ब व ड बरोबर
10.
राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड किंवा मवाळ युग म्हणून कोणता कालखंड ओळखला जातो ?
1) 1905 ते 1920
2) 1885 ते 1905
3) 1900 ते 1920
4) 1885 ते 1900
11.
खालीलपैकी कोण राष्ट्रीय सभेच्या मवाळ गटात होते ?
1) गोपाळ कृष्ण गोखले
2) फिरोजशहा मेहता
3) वरील सर्व
4) दादाभाई नौरोजी
12.
राष्ट्रीय सभेचे जहाल युग किंवा टिळक युग म्हणून कोणता कालखंड ओळखला जातो ?
1) 1905 ते 1920
2) 1900 ते 1920
3) 1885 ते 1905
4) 1905 ते 1925
13.
राष्ट्रीय सभेबाबत दिलेल्या विधानांपैकी बरोबर असलेल्या विधानाचा पर्याय निवडा.
1) दोन्ही विधान चूक
2) दोन्ही विधान बरोबर
3) शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे म्हणजेच अर्ज विनंत्यांचे राजकारण करणारे ते मवाळ.
4) स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल.
14.
राष्ट्रीय जहाल नेत्यांमधील लाल, बाल, पाल म्हणजेच _______________.
1) लाला लजपतराय, बाळशास्त्री जांभेकर, बिपिनचंद्र पाल
2) लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिंनचंद्र पाल
3) लाल बहादूर शास्त्री, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल
4) लाल बहादूर शास्त्री, बाळशास्त्री जांभेकर, बिपिनचंद्र पाल
15.
केसरी व मराठा या वृत्तपत्रांतून ब्रिटीश सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका कोणी केली ?
1) स्वातंत्र्यवीर सावरकर
2) लाला लजपतराय
3) दादाभाई नौरोजी
4) लोकमान्य टिळक
16.
बंगाल प्रांतातील जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र कोणते होते ?
1) दर्पण
2) अमृत बझार पत्रिका
3) रास्तगोफ्तार
4) प्रभाकर
17.
लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात असताना लिहिला ?
1) डोंगरीच्या तुरुंगात
2) येरवडा तुरुंगात
3) कराचीच्या तुरुंगात
4) मंडालेच्या तुरुंगात
18.
खालीलपैकी कोणी प्लेग कमिशनर रँडचा वध केला ?
1) अनंत कान्हेरे
2) चाफेकर बंधू
3) अरविंद घोष
4) मदनलाल धिंग्रा
19.
इ.स. 1905 मध्ये कोणत्या ब्रिटीश व्हाईसरॉयने बंगालची फाळणी जाहीर केली ?
1) लॉर्ड मिंटो
2) लॉर्ड कर्झन
3) लॉर्ड आयर्विन
4) लॉर्ड डलहौसी
20.
खालीलपैकी बरोबर विधानाचा पर्याय निवडा.
1) बंगाल हा मोठा प्रांत असल्याने प्रशासकीयदृष्ट्या कारभार करणे अवघड असल्याचे कारण पुढे करून बंगालची फाळणी करण्यात आली.
2) वरील सर्व.
3) बंगालच्या फाळणीमुळे मुस्लीम बहुसंख्यांकांचा पूर्व बंगाल तर हिंदू बहुसंख्यांकांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली.
4) स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करण्यासाठी बंगालची फाळणी करून हिंदू-मुस्लिमांत फुट पाडणे असा ब्रिटीशांचा हेतू होता.
21.
बंगालच्या फाळणीमुळे कोणता दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळण्यात आला ?
1) 19 जुलै
2) 7 जुलै
3) 16 ऑक्टोबर
4) 14 ऑक्टोबर
22.
ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज याने बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा केव्हा केली ?
1) 1911
2) 1910
3) 1909
4) 1912
23.
1905 साली बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
1) ग. वा. माळवनकर
2) गोपाळ कृष्ण गोखले
3) बाबू अंबिकाचरण मुजुमदार
4) दादाभाई नौरोजी
24.
इ.स. 1906 ला कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 'स्वराज्य' या शब्दाचा प्रथमतः उच्चार करण्यात आला . या अधिवेशनाचे अध्यक्ष ___________ होते.
1) लोकमान्य टिळक
2) सरदार वल्लभभाई पटेल
3) सरोजिनी नायडू
4) दादाभाई नौरोजी
25.
लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थत्यागाची शिकवण देणे तसेच धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या हेतूने ना. गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये _____________ ची स्थापना केली.
1) अभिनव भारत
2) भारत सेवक समाज
3) डिप्रेस्ड क्लासेस मिशन
4) सार्वजनिक सभा
26.
1906 साली मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या ब्रिटीश व्हाईसरॉयच्या उत्तेजनाने झाली ?
1) लॉर्ड कर्झन
2) लॉर्ड मिंटो
3) लॉर्ड आयर्विन
4) लॉर्ड डफरीन
27.
भारतीयांच्या मनातील ब्रिटिशांविरुद्धच्या असंतोषाला तात्पुरते शांत करण्यासाठी 1909 मध्ये कोणता सुधारणा कायदा करण्यात आला ?
1) रौलट कायदा
2) मॉंटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
3) मोर्ले- मिंटो सुधारणा कायदा
4) रेग्युलेटिंग अॅक्ट
28.
1909 च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यान्वये कायदेमंडळात कोणते बदल घडले ?
1) कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली.
2) या कायद्यान्वये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.
3) कायदेमंडळात काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश करण्याची तरतूद करण्यात आली.
4) वरील सर्व.
29.
भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916 च्या लखनौ अधिवेशनात 'लखनौ करार' (लखनौ ऐक्य करार) करण्यात करणात आला. करारानुसार ऐक्य किंवा समेट कोणात घडून आले ?
1) यापैकी नाही
2) दोन्ही बरोबर
3) ब] जहाल व मवाळ
4) अ] राष्ट्रीय सभा व मुस्लीम लीग
30.
पहिले महायुध्द केव्हा सुरु झाले ?
1) 1912
2) 1910
3) 1914
4) 1915
31.
पहिल्या महायुद्धाचे भारतावर कोणते परिणाम झाले ?
1) ब्रिटिशांनी भारतीयांवर आर्थिक निर्बंध लादले.
2) वरील सर्व
3) दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढले.
4) याविरुध्द डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी होमरूल लीग सुरु केली.
32.
भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी 1919 मध्ये ब्रिटीश पार्लमेंटने कोणता कायदा मंजूर केला ?
1) चार्टर अॅक्ट
2) मोर्ले-मिंटो कायदा
3) रौलट कायदा
4) मॉंटेग्यू चेम्सफोर्ड कायदा
33.
'हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे' अशा शब्दांत 1919 च्या मॉंटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर कोणी टीका केली ?
1) लोकमान्य टिळक
2) बिपिनचंद्र पाल
3) लाला लजपतराय
4) वि.रा.शिंदे
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top