This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
14 महाराष्ट्र राज्याची निर्मिती
1.
मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' महाराष्ट्रात कधी सुरु झाली ?
1) इ.स. 1950
2) इ.स. 1946
3) इ.स. 1945
4) इ.स. 1960
2.
'मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अमलाखाली असावी' असे आपल्या लिखाणातून कोणी लिहिले ?
1) न. चि. केळकर
2) प्र. के. अत्रे
3) नरेंद्र जाधव
4) दादोबा पांडुरंग
3.
मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा, त्यात मुंबई आणि मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागांचा समावेश करावा, असा ठराव महाराष्ट्र एकीकरण परिषदेने संमत केला. हि परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली भरली होती ?
1) वसंतराव नाईक
2) यशवंतराव चव्हाण
3) शंकरराव देव
4) नाशिकराव तिरपुडे
4.
भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी कॉंग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी नेमलेल्या समितीचे सदस्य खालीलपैकी कोण होते ?
1) वल्लभभाई पटेल
2) वरील सर्व
3) प. जवाहरलाल नेहरू
4) पट्टाभीसितारामय्या
5.
खालीलपैकी कोणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मुंबई महापालिकेत मांडला ?
1) एस. एम. जोशी
2) प्रबोधनकार ठाकरे
3) आचार्य अत्रे
4) फिरोजशहा मेहता
6.
राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
1) के. एम. पन्नीकर
2) डॉ. राजेंद्रप्रसाद
3) हृदयनाथ कुंझरू
4) एस. फाजल आली
7.
खालीलपैकी कोणती शिफारस राज्य पुनर्रचना आयोगाने केली होती ?
1) संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण करावे.
2) मराठवाडा हा भाग हैद्राबाद प्रांताचा अविभाज्य भाग असेल.
3) मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे.
4) वरील सर्व
8.
सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी नागपूर करार कोणत्या साली करण्यात आला ?
1) 1951
2) 1956
3) 1953
4) 1955
9.
मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी खालीलपैकी कोणत्या महिलेने आंदोलनात भाग घेतला नव्हता ?
1) सुचेता कृपलानी
2) दुर्गा भागवत
3) सुलताना जोहारी
4) सुमतीबाई गोरे
10.
7 नोव्हेंबर 1955 रोजी कामगारांची सभा झाली. खालीलपैकी कोण या सभेचे अध्यक्ष होते ?
1) कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे
2) आचार्य अत्रे
3) एस. एम. जोशी
4) नारायण मेघाजी लोखंडे
11.
मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा असा ठराव कामगारांच्या सभेत कोणी मांडला ?
1) मधु दंडवते
2) एस. एम. जोशी
3) भाई कोतवाल
4) क्रांतीसिह नाना पाटील
12.
खालीलपैकी संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित नसलेली व्यक्ती कोणती ?
1) लालाजी पेंडसे
2) सेनापती बापट
3) यशवंतराव घाटगे
4) क्रांतीसिह नाना पाटील
13.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मारक मुंबईत कोठे उभारण्यात आले ?
1) फ्लोरा फाउंटनजवळ
2) शिवाजी पार्क
3) गिरगाव चौपाटी
4) गेट वे ऑफ इंडिया समोर
14.
द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी करण्यात आली ?
1) 1 नोव्हेंबर 1956
2) 1 मे 1960
3) 26 जानेवारी 1956
4) 1 नोव्हेंबर 1950
15.
1 मे 1960 रोजी कोणत्या राज्यांची निर्मिती झाली ?
1) केरळ व महाराष्ट्र
2) महाराष्ट्र व गुजरात
3) महाराष्ट्र व गोवा
4) आंध्रप्रदेश व कर्नाटक
16.
1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची घोषणा कोणी केली ?
1) इंदिरा गांधी
2) यशवंतराव चव्हाण
3) डॉ. राजेंद्रप्रसाद
4) पंडित जवाहरलाल नेहरू
17.
खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले ?
1) शंकरराव चव्हाण
2) यशवंतराव चव्हाण
3) पंजाबराव देशमुख
4) वसंतराव नाईक
18.
खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते ?
1) नाशिकराव तिरपुडे
2) वसंतराव नाईक
3) वसंतराव पाटील
4) शंकरराव चव्हाण
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top