This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
7 लोकसंख्या
1.
लोकसंख्येतील वाढ किंवा घट कोणत्या घटकांशी निगडीत असते ?
1) जन्मदर व मृत्युदर
2) वरील सर्व
3) सरासरी आयुर्मान
4) स्थलांतर
2.
एका वर्षात दरहजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे _______.
1) जन्मदर
2) मृत्युदर
3) आयुर्मान
4) लोकसंख्या दर
3.
एखाद्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे यास कोणते स्थलांतर म्हणतात ?
1) बहि:स्थलांतर
2) पुन:स्थलांतर
3) अंत:स्थलांतर
4) यापैकी नाही
4.
एखाद्या प्रदेशाच्या विकासाचे निर्देशक खालीलपैकी कोणते ?
1) अनियंत्रित लोकसंख्या
2) लोकसंख्या नियंत्रणात असणे
3) लोकसंख्येत वाढ होणे
4) लोकसंख्येत घट होणे
5.
मुबलक साधनसंपत्ती असलेल्या प्रदेशाच्या तुलनेत साधनसंपत्ती कमी असलेल्या व हवामान अनुकूल नसलेल्या प्रदेशात लोकसंख्या ________.
1) जास्त असते
2) अनियंत्रित असते
3) कमी असते
4) सारखी असते
6.
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते ?
1) मृदा
2) वरील सर्व
3) हवामान
4) भौगोलिक स्थान
7.
शेती, कारखानदारी, नागरीकरण, वाहतूक, बाजारपेठ, इत्यादी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे कोणते घटक आहेत ?
1) राजकीय घटक
2) सामाजिक घटक
3) प्राकृतिक घटक
4) आर्थिक घटक
8.
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे सामाजिक घटक कोणते ?
1) रूढी व परंपरा
2) वरील सर्व
3) भाषा
4) धर्म
9.
देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजेच ________.
1) राष्ट्रीय उत्पन्न
2) दरडोई उत्पन्न
3) वयोगट प्रमाण
4) लोकसंख्येची घनता
10.
दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या म्हणजेच ________.
1) लोकसंख्येची घनता
2) लिंग गुणोत्तर
3) साक्षरता प्रमाण
4) वयोगट प्रमाण
11.
भारतात कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे कोणत्या वयांतील लोकसंख्या गट मानला जातो ?
1) 20 ते 50
2) 15 ते 59
3) 18 ते 60
4) 15 ते 35
12.
कार्यक्षम वयोगटात असूनही जे लोक नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत त्यांना काय समजले जाते ?
1) सुशिक्षित बेरोजगार
2) कार्यकारी
3) निरक्षर
4) अकार्यकारी
13.
किती वयापेक्षा अधिक वयोगटांतील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते ?
1) 10 वर्षे
2) 7 वर्षे
3) 12 वर्षे
4) 5 वर्षे
14.
1980 व 1990 च्या दशकात मानव विकास निर्देशांक हि संकल्पना कोणी मांडली ?
1) महबूब-अल-हक
2) दोन्ही पर्याय चूक
3) दोन्ही पर्याय बरोबर
4) अमर्त्य सेन
15.
मानव विकास निर्देशांक ठरविताना प्रामुख्याने कोणता निकष विचारात घेतला जातो ?
1) आर्थिक निकष
2) शिक्षण
3) आरोग्य
4) वरील सर्व
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top