This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
3 आर्द्रता व ढग
1.
बाष्प हा घटक वातावरणात कोणत्या स्थितीत असतो ?
1) उष्ण
2) स्थायू
3) द्रव
4) अदृश्य
2.
पाण्याचे बाष्पात रुपांतर करणारी प्रक्रिया म्हणजे काय ?
1) घनीभवन
2) बाष्पीभवन
3) सांद्रीभवन
4) बाष्पधारण
3.
बाष्पीभवनाची प्रक्रिया कशावर आधारित असते ?
1) वाऱ्याचा वेग
2) वरील सर्व
3) हवेची शुष्कता
4) तापमान
4.
हवा जसजशी थंड होते तसतशी तिची ______ क्षमता कमी होते.
1) सांद्रीभवन
2) बाष्पधारण
3) बाष्पीभवन
4) घनीभवन
5.
एका विशिष्ट तपमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते या स्थितीला कोणती स्थिती म्हणतात ?
1) बाष्पसंपृक्त स्थिती
2) बाष्पीभवन स्थिती
3) घनीभवन स्थिती
4) बाष्पधारण स्थिती
6.
हवेची बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून असते ?
1) पाण्याच्या तापमानावर
2) यापैकी नाही
3) हवेच्या तापमानावर
4) हवेतील ऑक्सिजनवर
7.
भूपृष्ठापासून जसजसे वर जावे तसतसे तापमानात कोणता बदल होतो ?
1) तापमान कमी होते
2) तापमान स्थिर राहते
3) तापमान वाढते
4) वरील सर्व
8.
एका विशिष्ट तपमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तारवरून काय सांगता येते ?
1) हवेची सांद्रीभवन क्षमता
2) हवेची सापेक्ष आर्द्रता
3) हवेची निरपेक्ष आर्द्रता
4) यापैकी नाही
9.
वातावरणातील वायुरुप बाष्पाचे जलरुपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
1) बाष्पीभवन
2) आर्द्रता
3) सांद्रीभवन
4) संप्लवन
10.
हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता _______.
1) स्थिर राहते
2) कमी होते
3) यापैकी नाही
4) वाढते
11.
अति उंचीवरील ढग सुमारे किती उंचीवर असतात ?
1) 7000 ते 14000 मी.
2) 5000 ते 10000 मी.
3) 6000 ते 12000 मी.
4) 8000 ते 15000 मी.
12.
खालीलपैकी कोणता अतिउंचीवरील ढगाचा प्रकार आहे ?
1) स्ट्रॅटस
2) क्युम्युलस
3) अल्टोक्युम्युलस
4) सिरस
13.
क्युम्युलोनिम्बस ढगांचे वैशिष्ट्य कोणते ?
1) वादळाचे निदर्शक ढग
2) काळ्या रंगाचे व घनदाट
3) ढगात विजांचा गडगडाट
4) वरील सर्व
14.
ढगांची उंची सुमारे 2000 ते 7000 मीटर दरम्यान असल्यास त्यांना कोणते ढग म्हणतात ?
1) यापैकी नाही
2) जास्त उंचीचे
3) मध्यम उंचीचे
4) कमी उंचीचे
15.
वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार कोणता ?
1) दव
2) दहिवर
3) ढग
4) धुके
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top