This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
NMMS बुद्धीमत्ता चाचणी 20 : कूटप्रश्न (अंकगणित)
1.
100 फळांच्या टोपलीत पेरुपेक्षा 4 पट सफरचंद, 5 पट संत्री जास्त आहेत. जर पेरू, सफरचंद आणि संत्री यांची किंमत 2:3:4 या प्रमाणात असेल तर फळांच्या टोपलीची किंमत किती ?
1) 260
2) 400
3) 300
4) 340
2.
एक माकड 22 मी. उंच असलेल्या झाडाच्या टोकावर जाण्याचा प्रयत्न करते. ते माकड प्रत्येक उडीला 1 मी. वर जाते व 1/2 मी. खाली घसरते. तर त्या माकडाला झाडाच्या टोकावर पोहोचण्यासाठी किती उड्या माराव्या लागतील ?
1) 29
2) 43
3) 28
4) 56
3.
एका माणसाला 5 भाऊ आणि 3 बहिणी व त्याच्या पत्नीला 3 भाऊ व 5 बहिणी आहेत. सर्वजण चहा पिण्यासाठी जमले. चहा पुरुषांसाठी 10 रु. कप तर स्त्रियांसाठी 8 रु. कप असेल तर सर्वजण चहा पिण्यासाठी एकूण खर्च किती करावा लागेल ?
1) 152
2) 162
3) 144
4) 128
4.
64 चे 2/7 म्हणजे किती ?
1) 224
2) 18 2/7
3) 448
4) 128
5.
जर पाच क्रमवार संख्यांच्या वर्गाची सरासरी 18 असेल तर, त्या संख्यांची सरासरी किती ?
1) 5
2) 8
3) 7
4) 6
6.
एका त्रिकोणाचे व आयताचे क्षेत्रफळ सारखे आहे. आयताची लांबी हि रुंदीच्या पाचपट आहे. जर त्रिकोणाचे क्षेत्रफळ 20 चौ. मी. असेल व त्रिकोणाची उंची आयताच्या लांबीच्या अर्धी असेल तर त्रिकोणाचा पाया किती ?
1) 6
2) 10
3) 8
4) 5
7.
जर दोन संख्यांची बेरीज 115 असेल व त्यामधील फरक 35 असेल तर त्याचा गुणाकार किती ?
1) 3250
2) 2750
3) 3375
4) 3000
8.
दोन नद्यांची (A आणि B) एकत्र लांबी 850 किमी आहे. जर A नदीची लांबी B नदीपेक्षा पेक्षा 250 किमी कमी आहे. तर B नदीची लांबी किती ?
1) 600
2) 300
3) 550
4) 400
9.
एका जंगलामध्ये 1/6 सिंह आहेत, 1/3 चित्ते आहेत, आणि उर्वरित इतर प्राणी आहेत, तर इतर प्राण्यांची संख्या किती ?
1) 66 2/3
2) 33 1/3
3) 40
4) 50
10.
वडिलांचे व मुलाचे आजचे एकत्रित वय 75 वर्ष आहे. आजपासून 10 वर्षानंतर वडिलांचा 60 वा वाढदिवस असेल तर मुलाचे आजचे वय किती ?
1) 24 वर्ष
2) 35 वर्ष
3) 20 वर्ष
4) 25 वर्ष
11.
एका मेंढपाळाला मेंढ्यांची संख्या विचारली असता त्याने एकूण कळपाच्या 1/4, 1/5 आणि 1/6 मिळून 37 मेंढ्या होतात असे उत्तर दिले तर कळपातील मेंढ्यांची एकूण संख्या किती ?
1) 30
2) 80
3) 60
4) 120
12.
जर A आणि B यांची बेरीज 116 आहे. जर A हि संख्या C पेक्षा 3 ने कमी आहे पण B पेक्षा 4 ने जास्त आहे, तर C किती असेल ?
1) 60
2) 63
3) 56
4) 66
13.
एक व्यक्ती ठराविक अंतरावर 40 किमी प्रती तास या वेगाने जातो व 60 किमी प्रती तास या वेगाने परत येतो तर त्याचा सरासरी वेग किती ?
1) 44
2) 48
3) 50
4) 55
14.
एक मोटार 30 किमी अंतर कापते. ते मोटार अर्धे अंतर 45 किमी प्रती तास या वेगाने तर अर्धे अंतर 60 किमी प्रती तास या वेगाने कापते तर त्या मोटारीला पूर्ण अंतर कापायला किती मिनिटे वेळ लागेल ?
1) 15
2) 20
3) 35
4) 30
15.
जर महिन्याच्या 2 तारखेला शुक्रवार येत असेल तर त्याच महिन्याच्या 25 तारखेपासून तिसऱ्या दिवसानंतर कोणता वार येणार. ?
1) शुक्रवार
2) बुधवार
3) सोमवार
4) गुरुवार
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top